निवडुंग!

Started by मिलिंद कुंभारे, March 26, 2013, 03:48:04 PM

Previous topic - Next topic

मिलिंद कुंभारे

निवडुंग!

अपयश,
मनाच्या वाळवंटात,
उगवलेलं निवडुंग!
बोचतंय मला रात्रंदिवस,
असह्य करतंय,
जगणं माझं!

सूर्य रोज उदयास येतो,
उधळीत आशेची किरणं!
पण डोळ्यांसमोर माझ्या,
फक्त निराशेचं धुकं!
झुरतय मन,
बघाया धुक्यांआड,
लपलेला वसंत!

पण किळसवानं, अर्थहिन
असतंय ते जगणं,
अगदी एकाकी एकट,
शोधीत हरवलेलं,
स्वतःचच अस्तित्व!
कधी वाटतं करून टाकावा,
त्या क्षणभंगुर जीवनाचा अंत!
पण तेही असतं अवघड!

मग  उरतंय,
एकट्याचच एकलकोंड विश्व!
शून्यात अडकलेलं,
जिथं सोबतीला असतं,
फक्त निवडुंग!
अन
बोचणाऱ्या काट्यांची,
गोळा-बेरीज करत,
कसं -बसं मरत-मरत जगणं!
जणू  न उमगलेलं एक कोडं!

मिलिंद कुंभारे


santoshi.world

nice .... i like it very much ....... keep writing n keep posting :)

मिलिंद कुंभारे

प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद! :) :) :)

केदार मेहेंदळे

sundar kavita..................
nivadungachya katyan sarkhi,
tyhcya fulan sarkhi
un tyatlya panya sarkhi

मिलिंद कुंभारे

केदार दादा!

अभिप्रायाबद्दल धन्यवाद!

निवडूंगाला पाने, फुले मी कधी बघितलीच नाही! :(
त्यात मला फक्त काटेच दिसली!
अन तीही सदैव बोचणारी, सलणारी!
आयुष्यात  माझ्या सुरुंग पेरणारी! :( :( :(

मिलिंद कुंभारे  :)

Ganesh Naidu


मिलिंद कुंभारे

प्रिय गणेश,
धन्यवाद! :)



मिलिंद कुंभारे

विक्रांतजी!!
खूप खूप धन्यवाद!!! :) :) :)

पिंकी