कोण आहे कोणाचे आधार नसलेल्या मनाचे

Started by tejam.sunil@yahoo.com, March 26, 2013, 11:01:18 PM

Previous topic - Next topic

tejam.sunil@yahoo.com



या वाहणाऱ्या वार्यासंगे
का झोंबतो एकांत मला
लाडिक लचके देत
का छळतो हा सारखा मला

इकडे तिकडे शोधू लागतो
आधार नसतो माझा मला
खूप प्रयत्न करून सुद्धा
परका होतो मी स्वताला

रोमांचल सार अंग माझ
अश्रूत रडतो प्रत्येक क्षणाला
शहारा तो कातील अदा
वाया जातो सारा प्रयत्न माझा

का कोण जाने कोणास ठाऊक
काय झाले या वेड्या मना
भाऊक सारी दुनिया हि
कोण आडोसा देत नाही काही क्षणाला

येउन तडक बिलगली आठवण
आता कसे विसरू माझे मला
लपण्यास नाही जागा कुठे
या जगानेच केले पोरके मला

आता आवरून घेतो अश्रू माझे
पुन्हा लाडिक हसला चेहरा माझा
दुखाचा ढीगोर्यातून
मुखवटा घातला मी ह्स्याच्या

@ सुनिल

santoshi.world


मिलिंद कुंभारे

आता आवरून घेतो अश्रू माझे;
पुन्हा लाडिक हसरा चेहरा माझा!
दुःखाच्या ढिगोरयावर;
मुखवटा चढवला मी हास्याचा!

ओळी आवडल्यात!
असाच प्रयत्न करीत राहा! नवनवीन कविता लिहित रहा! :) :) :)