लपंडाव

Started by sudhanwa, March 27, 2013, 05:09:11 AM

Previous topic - Next topic

sudhanwa

लहानपणच्या लपंडावत निरागसता होती
पकडलं जाण्याची धाकधुक नक्कीच होती
पण जीवावर बेतण्याची भिती मात्र नव्हती

कचण्यात जास्तीची मेजाॅरीटी होती
अन् कमीची कमिटी होती
पण राजकारणाची लाॅबी मात्र नव्हती

नवा गड़ी आला तर
नवं राज्य मिळायचं
अलिखीत नियमांचही
पालन केलं जायचं

घोड्यासारखं हात लावून
दहा, वीस, तीस...अशी आरोळी ठोकायची
आवाजाच्या स्वरात; दादागिरी मात्र नसायची

सारखं सारखं राज्य आलं तर
हताश नाही व्हायचो
कंटाळलो तरी राजीनामा नाही द्यायचो

धप्पा देण्यात;
विजयाच्या ललकारीही होत्या
पराजयाचा सुुःस्कारही होता
पण पाय खेचण्याचे प्रकार मात्र नव्हता

लपण्याच्या जागापण ठरलेल्याच,
जागेवरुन ऐनवेळी तंटेपण व्हायचे
पण त्यासाठी कोणी कोणाला
कोर्टात नाहीं न्यायचे

चकवा देण्यासाठी
शर्ट बदलले जायचे
पण स्वार्थासाठी कोणी
रंग नाही बदलायचे

आजही मी त्याच अंगणात उभा आहे,
राज्य घेण्याची भिंत बघतो आहे
धप्पा देणारयांची कुजबुज शोधतो आहे
लपंडावातली निरागसता हुडकतो आहे....

केदार मेहेंदळे


sudhanwa

धन्यवाद केदार साहेब