जीवन कसे असणार...

Started by Ankush S. Navghare, Palghar, March 30, 2013, 01:04:23 AM

Previous topic - Next topic

Ankush S. Navghare, Palghar

रात्रीच्या अंधारात
मनाचे रडणे
पापण्यांच्या कडांत
आसवांचे पडणे
हृदयात खोलवर
आठवण एक येते
काट्यान्हून बोचरे
काहीतरी खुपते
रोज रोज तेच
मरत मरत जगणे   
डोळे सतत उघडे
झोपेचे मोडणे
कधी हे संपणार
दुख हे विरणार
कधी ह्या जीवनाला
साथ तुझी लाभणार
रोज हाच विचार
आता कसे होणार
तुझ्याशिवाय माझे
जीवन कसे असणार
जीवन कसे असणार...

... प्राजुन्कुश
... Prajunkush
 

मिलिंद कुंभारे


Ankush S. Navghare, Palghar


केदार मेहेंदळे



Ankush S. Navghare, Palghar


SurabhiJoshi