जीवन

Started by harshal_lagwankar, March 30, 2013, 01:34:36 PM

Previous topic - Next topic

harshal_lagwankar

             जीवन

जीवन म्हणजे दोन नसण्या मधलं एक असणच आहे
हे असणही फसवच असल्याने, तसं ते नसणच आहे  ||धृ||

मागेही मी नव्हतो, त्याचा ना क्षोभ आहे ना क्षिती
पुढेही मी नसणार, त्याची ना तमा आहे ना भीती
वर्तमानात मला इतिहास रचणच आहे  ||१||
हे असणही फसवच असल्याने...............

मागे अनंत पुढे अनंत, भोवताली अंत आहे
जाणिवांच्या विझवा मशाली त्यांचीच खरेतर खंत आहे
दुनियेच्या या हरित पटावर, असं पुन्हा कधीतरी दिसणच आहे ? ||२||
हे असणही फसवच असल्याने...............
   By शरद लागवणकर
       मुंबई दिनांक ३०/३/२०१३




nihar.lagwankar

Jeevanach tatvadnyan gambhiyaryapurvak kathan karnari, Arthavaahi, Antarmukh Karnari
Ek Sashakt Kavita!!!!
              Nihar L from Dombivali

केदार मेहेंदळे


kiran varade


NAMA


मिलिंद कुंभारे