**जाणीव**

Started by harshal_lagwankar, March 31, 2013, 03:19:32 PM

Previous topic - Next topic

harshal_lagwankar

जाणीव

तो जन्मला, तो मी नव्हेच
तो मेला, तो मी नव्हेच ||धृ||

तो विशेष सन्मानाने पदवीधर झाला,
तो मी नव्हेच

त्याला महाविद्यालयातून काढून टाकले,
तो मी नव्हेच ||१||

त्याचे, सुंदर, श्रीमंत तरुणीशी लग्न झाले,
तो मी नव्हेच

त्याने तिला अर्ध्यावर अर्धचंद्र दिला,
तो मी नव्हेच ||२||

तो बहुमताने निवडून येउन मंत्री झाला,
तो मी नव्हेच

तो चपराशी म्हणून टपाल खात्यात चिकटला,
तो मी नव्हेच ||३||

त्याचा "भारतरत्न" म्हणून देशाने गौरव  केला,
तो मी नव्हेच

त्याला निर्घुण गुन्ह्याबद्दल फासावर लटकाविले,
तो मी नव्हेच ||४||

तथापि,  त्याच्यासाठी "मी" देखील "तो" आहे
म्हणून तर "तो" सुद्धा माझ्यासाठी "मी"  च  आहे ||५||


   By शरद लागवणकर
   मुंबई दिनांक ३१/३/२०१३