खरच! कशी सुचते कविता?

Started by केदार मेहेंदळे, April 01, 2013, 09:55:20 AM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

प्रिय मित्र मिलिंद,
तुझ्या "कविता कशी लिहावी?", आणि "कविता  copy pest चोर बाजार" ह्या प्रश्नाच्या चर्चेला अनुसरून हि कविता पोस्ट करत आहे. मला माहितेय कि शेवटच्या कडव्यात लिहिलेला दृष्टीकोन कठीण आहे....पण प्रयत्न करायला काय हरकत आहे?

खरच! कशी सुचते कविता?
सुचते मला? का येते स्वताहून?
मनात येते, डोक्यात येते
आणि उतरते कागदावर ह्तातून?
खरच! कशी सुचते कविता?

प्रयत्न करूनही कधी
सुचत नाही कविता
अन बरसते कधी अचानक
श्रावण सरी सारखी कविता
कळत मात्र नाही, कशी सुचली कविता!

अचानक गळतं पान एखादं
अन सुचते कविता झुळुकी सारखी
किंवा वाजते मंदिरात मंजुळ घंटा
अन अवतरते कविता
साक्षात्कार सारखी 

कधी वाटतं मी आहे
केवळ एक मध्यम
कवितेला ह्या जगात आणण्या साठी
जशी देवकी होती कृष्णा साठी 
आणि जानकी रामा साठी

काही असलं तरी,
मिळतं समाधान कविता लिहिल्यावर
अन वाटतं, कवितेत
माझंच आहे प्रतिबिंब, अमर,
शब्द रूपातलं

मी ह्या जगात असेन, नसेन
माझे शब्द इथेच असतील
कविते खाली माझं नावं
असेल नसेल
माझे विचार कवितेत असतील

रहातील इथेच हे शब्द अन
वाचीन ह्याच कविता मी
कुठल्या तरी जन्मात पुन्हा, कधीतरी
अन करीन विचार स्वतःशीच
खरच! कशी सुचते कविता?



केदार...

मिलिंद कुंभारे

मी ह्या जगात असेन, नसेन
माझे शब्द इथेच असतील
कविते खाली माझं नावं
असेल नसेल
माझे विचार कवितेत असतील! :) :) :)

प्रिय केदार दादा!
तुमच्या ह्या ओळींशी मी पूर्णपणे सहमत आहे!
ह्याच ओळींचा आशय घेऊन मी एक चारोळी लिहीन!
मला कविता आवडलीय व त्यातला उद्देशहि!

मिलिंद कुंभारे  :) :) :)