यशा ....

Started by Ganesh Naidu, April 01, 2013, 10:17:55 AM

Previous topic - Next topic

Ganesh Naidu

टक लाऊन बघतो यशा तुझी पाऊलवाट ...
एकदा तरी स्पर्श कर जणू मी किनारा तू सागरी लाट ..
रोज दिवस उजेडतो या आशेने ...
आनंद होईल तुझ्या भेटीने..
सांजवेळी घरी परतताना ..
अश्रू  येई तुला रागवताना ....
काडीज जळे तुला दुसर्याकडे बघताना ...
खंत मज वाटे परत एकदा हरताना ...
अपेक्षांचे ओझे मज सहावत नाही ...
तुझवाचून दूर राहवत नाही ...
आसुसलेले डोळे त्या आईचे मजकडे बघतात ...
तिला बघून पापने  झुकतात ....
लाज मज वाटे बाबांकडे बघतांना ...
झीजलेत  त्यांचे  हात मजसाठी राबताना ....
कस समजाऊ त्यांना प्रयत्न मी करतोय..
रोज उन्हात चालून घाम मी गाळतोय ...
वाटे मज बनावी त्यांची काठी ...
मज बघून फुलावी त्यांची छाती ....
मन भरून आले जणू दाटले आभाळ ...
यशा .... जवळ ये अन मजला कवटाळ ....

केदार मेहेंदळे


Ganesh Naidu


मिलिंद कुंभारे

गणेशजी!
छान कविता आहे! :) :) :)

Ganesh Naidu

dhanyawad milind... ;D

milind ji mala vatat sarvana prem kavita avdatat ... hi khup manapasun lihli hoti.... phar kami lokani vachli.... :(

मिलिंद कुंभारे

गणेशजी!
गणेशजी!
निराश होऊ नका!
तुमच्या कविता हळू हळू सगळेच वाचतील! :) :) :) :) :) :) :) :)

विक्रांत

गणेश .कविता लिहली कि आपला तिचा संबंध संपला .तुम्हाला लिहितांना मजा आली ना ! मग बस .लक्षात ठेवा आपण कविते साठी आहोत .कवितेचे आभारी आहोत .कृपा आहे ही .

मिलिंद कुंभारे

गणेशजी!
ही कविता खास तुमच्यासाठी  :(:) :) :)

पावसाळा! :)

कळतच नाही;
हरवतो कुठे;
गंध ओल्या मातीचा;
अन केव्हा संपतो;
पावसाळा!

आता ग्रीष्म;
आयुष्याला चिकटलेला;
मंजिल जवळ असताना;
रस्ता मात्र लांबलेला!

आता
ओंजळीतलं चांदणं निसटलेलं
उंच उंच भरारी घेणारं मन;
थांबलेलं, खचलेलं
अन
पायाखालची वाळू सरकल्यागत होतं!
पुनवेच्या रातीचं स्वप्न धुक्यांआड विरून जातं!

तरीही का कुणास ठाऊक;
माणूस मात्र जगत असतो;
जगण्यासाठी रोज रोज मरत असतो!
सागरातल्या लाटांमधला जिवंतपणा;
डोळ्यांत साठवत;
मनात दाटलेला पाऊस;
पापण्याआड दडवत;
तो मात्र आसुसलेला;
जणू
कित्येक दिवसांचा तहानलेला;
पुन्हा एकदा
त्याच पावसात चिंब भिजायला!
शोधीत पुन्हा
हरवलेला गंध तो ओल्या मातीचा!

मिलिंद कुंभारे :( :) :) :)

Ganesh Naidu

milind ji khup khup dhnyawad... phar sundar kavita ahe.... 

Ganesh Naidu

vikrant ji  dhnyawad pratisadabadal ani samjavnyabadal.... :)  :) :)