.......:- तुझा रुसवा -:........

Started by tejam.sunil@yahoo.com, April 02, 2013, 02:28:18 PM

Previous topic - Next topic

tejam.sunil@yahoo.com

मला माहित आहे सये
हा काही क्षणाचा रुसवा
हळूहळू  तुझा तो
नाकावरचा राग फसवा

हळूहळू आपल्या दोघात होतो
पुन्हा रागाचा दुरावा
पापणी आडच्या स्वप्नांना
पुन्हा रात्रीचा पुरावा

हट्टास मी तुझ्या
होतो बळी माझा
तो त्रास मी एकटा
का सोसावा

असच आहे तुझा
खट्याळपणा
घेतो मिठीत तुला पण
तो भास माझा असावा

नाना नखरे तुझे 
अन तो रूसव्याचा डोंगर
कधी रागावल्यावर फुटतो
तो आसवात पाझरावा

कधी हसतेस खूप गोड
पडते गाली खळी
मग हळूच रुसवा फुटतो
पुन्हा खुलते हास्याची कळी

मग पुन्हा होते सुरुवात
आपल्या गोड नात्याची
विश्वासाने मारलेली
ती मिठी आपल्या प्रेमाची

@ सुनिल

मिलिंद कुंभारे