आणि भांडण सुरु झालं !

Started by pralhad.dudhal, April 02, 2013, 02:54:29 PM

Previous topic - Next topic

pralhad.dudhal

 आणि भांडण सुरु झालं !

टी व्ही समोर बसून
उगाच चैनेल चाळत होतो
बायकोने विचारले-
टी व्ही वर काय आहे ?
मी म्हणालो भरपूर धूळ!
.........आणि भांडण जोरात सुरु झालं !
लग्नाच्या वाढदिवशी
गिफ्ट काय हवी ?
विचारलं तेव्हां म्हणाली-
अस काहीतरी हव...
...एक पासून शंभर पर्यंत
तीन सेकंदात पळेल!
मी वजन काटा दिला!
......... आणि भांडण जोरात सुरु झालं !
रविवारी फिरायला जाऊया का? विचारलं...
मला  महागड्या जागी घेऊन चला म्हणाली-
मी तिला  पेट्रोलपंपावर नेलं !
......... आणि भांडण जोरात सुरु झालं !
आरशात प्रतिबिंब पाहून
काळजीत पडून म्हणाली-
काय मी भयंकर दिसतेय !!!
तुमच मत काय आहे ?
मी म्हणालो
तुझा चष्म्याचा नंबर..
परफेक्ट आहे!
......... आणि भांडण जोरात सुरु झालं !
मी विचारलं -
वाढदिवसाला कुठे जाऊ या ?
ती म्हणाली
जेथे खूप दिवसात मी  गेलेली नाही !
मी तिला स्वयपाक घरात नेलं!
......... आणि भांडण जोरात सुरु झालं !

............एक भाषांतरीत कविता

केदार मेहेंदळे


मिलिंद कुंभारे


Ganesh Naidu

#3
 :D :D  :D

rudra



sweetsunita66