अखेर तीच वेडी आशा ती नुसती उरली ......

Started by Mandar Bapat, April 02, 2013, 04:51:54 PM

Previous topic - Next topic

Mandar Bapat

रुताया लागली ही जाळी आठवणीची मनाला,

गुंतलो गेलो तुझ्या जाळ्यात मी सारा...

न म्हणाया  धागा ही  जोडणारा तुटला,

अजूनही आहे अडकला धाग्यात जीव बिचारा....


रडून उघडली  धरणे दाट  पापण्यांची

आटली हुंदके पसरला दुष्काळ हा खरा....

छबी डोळ्यात तुझी दिसते स्पष्ट जरी

डोळे वेडावले नीज दे डोळ्यात तू जरा.....


का गेली दूर एवढा लावून लळा

एकटे सारे जग आता वाटे मजला ......

दमलो खूप सारा श्वास अर्धा उरला

बघून तुझी वाट  हा पुरा देह झिजला .....


हा जन्म नव्हता आपला बहुतेक तसा

मी हि एकटा तू हि तशीच एकटी झुरली  ....

आता वाट फक्त त्या पुढल्या जन्माची ...

अखेर तीच वेडी आशा  नुसती उरली ......

अखेर तीच वेडी आशा ती नुसती उरली ...... :(


                                            ........ मंदार  बापट 



मिलिंद कुंभारे







Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]