पावसाळा!

Started by मिलिंद कुंभारे, April 03, 2013, 03:50:35 PM

Previous topic - Next topic

मिलिंद कुंभारे

पावसाळा!

कळतच नाही;
हरवतो कुठे;
गंध ओल्या मातीचा;
अन केव्हा संपतो;
पावसाळा!

आता ग्रीष्म;
आयुष्याला चिकटलेला;
मंजिल जवळ असताना;
रस्ता मात्र लांबलेला!

आता
ओंजळीतलं चांदणं निसटलेलं
उंच उंच भरारी घेणारं मन;
थांबलेलं, खचलेलं
अन
पायाखालची वाळू सरकल्यागत होतं!
पुनवेच्या रातीचं स्वप्न धुक्यांआड विरून जातं!

तरीही का कुणास ठाऊक;
माणूस मात्र जगत असतो;
जगण्यासाठी रोज रोज मरत असतो!
सागरातल्या लाटांमधला जिवंतपणा;
डोळ्यांत साठवत;
मनात दाटलेला पाऊस;
पापण्याआड दडवत;
तो मात्र आसुसलेला;
जणू
कित्येक दिवसांचा तहानलेला;
पुन्हा एकदा
त्याच पावसात चिंब भिजायला!
शोधीत पुन्हा
हरवलेला गंध तो ओल्या मातीचा!

मिलिंद कुंभारे

santoshi.world


मिलिंद कुंभारे


केदार मेहेंदळे


विक्रांत


मिलिंद कुंभारे

प्रिय केदार्जी , संतोषी ताई, विक्रांतजी!!
खूप खूप धन्यवाद!!!

आपल्या सर्वांच्या प्रतिसादामुळेच माझ्याकडून नवीन कविता लिहिल्या जातात!
असेच प्रतिसाद देत रहा!
म्हणतात ना.... अकेला चला था......लोग मिलते गये और कारवा बनता गया.......
तसंच मला प्रतिसाद मिळत गेला...... अन मी नव-नवीन कविता लिहित गेलो....लिहित राहील!!!!!
पुन्हा एकदा धन्यवाद!! :) :) :)

मिलिंद कुंभारे


मिलिंद कुंभारे

खूप खूप धन्यवाद! :)


मिलिंद कुंभारे


पिंकी....
धन्यवाद! :)