आई दुष्काळ म्हणजे काय ग…?

Started by टिंग्याची आई..., April 03, 2013, 05:17:24 PM

Previous topic - Next topic

टिंग्याची आई...

दुष्काळ दुष्काळ म्हणजे...
नक्की काय असतं ग आई... ?
पुस्तकातल्या एवढ्याशा धड्यात...
खास काही समजलच नाही...

काय उत्तर द्याव यावर...
आईला क्षणभर काहीच सुचेनासं झालं....
नकळत आईच्या डोळ्यांत...
टचकन पाणी आलं....

तरीही उत्तर दिलं...
बाळ... दुष्काळ म्हणजे खरतर...
शेतकऱ्याच्या आयुष्याला लागलेलं ग्रहण...
करपून जात नशीब ज्याचं...
दुष्काळाचे चटके करताना सहन....

नदीच्या प्रत्येक थेंबासोबत...
शेतकऱ्याच रक्तही आटतं...
रखरखणार मोकळ आभाळ...
पोराबाळांच्या डोळ्यांत दाटतं...

भेगाळलेली कोरडी जमीन...
नजर जाईल तिथवर पसरलेली....
वर्षानुवर्ष वाट पाहणारी म्हातारी आजी....
सुख काय असतं... नेमकं हेच विसरलेली....

अगदी थेंबभर पाण्यासाठी...
तरसणारी एक एक घागर...
कवा पावल माहित नाही तरीही....
देवीला न चुकता घातलेला कोरडाच जागर....

छातीवर दगड ठेऊन...
रोजच कोंड्याची भाकर थापणारी आई...
दुधापायी गेलेल्या वासरासाठी...
गोठ्यात हंबरडा फोडणाऱ्या गाई...

पावसाच्या एका थेंबासाठी तरसणारा...
काळ्या मातीचा कण अन कण...
रोज नव्या कर्जात बुडून...
आत्महत्येच्या उंबरठ्यावर पोचलेलं शेतकऱ्याच मन....

वर फाटक आभाळ...
अन पायाखाली कोरडी धरणी...
असाच काहीसा असतो हा दुष्काळ...
आपलाच गुन्हा... का बर म्हणावी हि देवाची करणी...?

आई... थांबवता नाही का येणार हे...
आपल्या लाडक्या बाप्पाला सांगून...?
बाळा... तोही आता थकलाय रे...
आपली रोजची गार्हाणी ऐकून...

थांबवायचं असेल हे सगळ....
तर आपणच पाऊल उचलायला हवं...
त्यांचं दुखं आणि आपलं सुख...
थोड थोड वाटून घ्यायला हवं...
कण कण साठवून अन थेंब थेंब जिरवून....
या निसर्गाला पुन्हा वाचवायला हवं...
- Shailja
Mahit nahi kashi jhaliye...

santoshi.world

speech less :( .... premavarchya kavita kai kunihi lihu shakato pan ashya kavita karnyasathi kharach kavi manach lagat ......... hatts of to u .... keep writing n keep posting ...

PS : moving it to Gambhir Kavita Section. tya section madhye hi jast suit hote .... kavite khali tumch nav hi shakyto marathi font madhyech liha ....


केदार मेहेंदळे


मिलिंद कुंभारे

खूपच छान! :) :) :)

दुष्काळ म्हणजे...

भेगाळलेली कोरडी जमीन...
नजर जाईल तिथवर पसरलेली....
वर्षानुवर्ष वाट पाहणारी म्हातारी आजी....
सुख काय असतं... नेमकं हेच विसरलेली....

rudra

kharach manala sparsh karnari kavita ahe......
jyani dushkal pahilay ani bhoglay toch hi vidhane mandu shakto....
santoshine sangiltyaparamane kavita gambhir vibhagat post karavi....

indradhanu


दुष्काळ दुष्काळ म्हणजे...
नक्की काय असतं ग आई... ?
पुस्तकातल्या एवढ्याशा धड्यात...
खास काही समजलच नाही...

काय उत्तर द्याव यावर...
आईला क्षणभर काहीच सुचेनासं झालं....
नकळत आईच्या डोळ्यांत...
टचकन पाणी आलं....

तरीही उत्तर दिलं...
बाळ... दुष्काळ म्हणजे खरतर...
शेतकऱ्याच्या आयुष्याला लागलेलं ग्रहण...
करपून जात नशीब ज्याचं...
दुष्काळाचे चटके करताना सहन....

नदीच्या प्रत्येक थेंबासोबत...
शेतकऱ्याच रक्तही आटतं...
रखरखणार मोकळ आभाळ...
पोराबाळांच्या डोळ्यांत दाटतं...

भेगाळलेली कोरडी जमीन...
नजर जाईल तिथवर पसरलेली....
वर्षानुवर्ष वाट पाहणारी म्हातारी आजी....
सुख काय असतं... नेमकं हेच विसरलेली....

अगदी थेंबभर पाण्यासाठी...
तरसणारी एक एक घागर...
कवा पावल माहित नाही तरीही....
देवीला न चुकता घातलेला कोरडाच जागर....

छातीवर दगड ठेऊन...
रोजच कोंड्याची भाकर थापणारी आई...
दुधापायी गेलेल्या वासरासाठी...
गोठ्यात हंबरडा फोडणाऱ्या गाई...

पावसाच्या एका थेंबासाठी तरसणारा...
काळ्या मातीचा कण अन कण...
रोज नव्या कर्जात बुडून...
आत्महत्येच्या उंबरठ्यावर पोचलेलं शेतकऱ्याच मन....

वर फाटक आभाळ...
अन पायाखाली कोरडी धरणी...
असाच काहीसा असतो हा दुष्काळ...
आपलाच गुन्हा... का बर म्हणावी हि देवाची करणी...?

आई... थांबवता नाही का येणार हे...
आपल्या लाडक्या बाप्पाला सांगून...?
बाळा... तोही आता थकलाय रे...
आपली रोजची गार्हाणी ऐकून...

थांबवायचं असेल हे सगळ....
तर आपणच पाऊल उचलायला हवं...
त्यांचं दुखं आणि आपलं सुख...
थोड थोड वाटून घ्यायला हवं...
कण कण साठवून अन थेंब थेंब जिरवून....
या निसर्गाला पुन्हा वाचवायला हवं...
- Shailja
Mahit nahi kashi jhaliye...
khup sundar ahe kavita..

टिंग्याची आई...

Khoop Khoop abhari ahe.....  Je kahi ajvar vachlay, aiklay ani T.V. var vagaire pahilay tyatun kahitari lihaycha chotasa prayatn hota.... :)
It feels really good when I read your comments.. and inspires to write further.... :) Thank you all.. :)


Mahesh pansare

 दुखणं,....
गरीबीची ब्याद मोठी
रोज भाकरीची बोंब हाय
दुखण्यानं बेजार सारी
दव्यानही गुण न्हाय,,
हाथरून धरलंय म्हातारीनं
पोरगं भारी तापलंय
हिच्या आजाराचं थैमान
देवरूश्यानंच कापलंय,,
घास उतरून टाकलं भारी
टोपलं उतारॅनंच रितं
अंगारं भूती भंडारॅनं
दुखणंहो कुठचं जातं,,
डाक्टर नाडला पैशाला
भार सोसवंना खिशाला
बामण म्हणला ग्रहदशा
पाहिजे डाक्टर कशाला,,
ग्रहशांती घालून झाली
पीडा काय गेली न्हाय
करणी कुणी केली म्हणतंय
भगत्याला दावलं काय,,,अपूर्ण आहे.,,,महेश पानसरे,