आधारवड

Started by swatium, April 04, 2013, 05:08:22 PM

Previous topic - Next topic

swatium

आधारवड



कालच्या वादळात

स्वप्नांची होळी झाली

आधाराचे खांब वाचवताना

हातांना जखमा झाल्या आणि मेंदू सुन्न

अखेर खांब कोसळलेच

आणि घरही जमीनदोस्त

आता ठरवलंय

बिन खाम्बांचेच घर बांधायचे

स्वतःतच आधारवड रुजवायचा

आपल्या पारंब्या आपणच व्हायचे

मग

आधार कोसळण्याचे दुःख तर नसेलच

पण निराधार होण्याचे भय सुद्धा सरेल

नाहीतरी

वादळात वाहून जाणारा आधार हवाच कशाला

स्वप्नांची होळी झाल्यावर त्यातून उडणारा

फिनिक्स तरी कशाला

स्वप्नातून कधीतरी जागे व्हायलाच हवे

चांगले खडबडून

जागे झाल्यावर  पुन्हा झोपण्याचा

स्वप्नांना कवटाळण्याचा

व्यर्थ अट्टाहास तरी कशाला

सत्याला सामोरे जायलाच हवे

असे कि

पुन्हा स्वप्नांची आठवण सुद्धा येऊ नये

पण असेल का असे सत्य ....?

..................................स्वाती मेहेंदळे

(एक भिजले वाळवंट मधून )





केदार मेहेंदळे


मिलिंद कुंभारे

छान प्रयत्न आहे! :) :) :)