भूतकाळाचे भूत

Started by shraddha.shinde.3990, April 05, 2013, 03:15:44 PM

Previous topic - Next topic

shraddha.shinde.3990

आज अचानक तू देखील माझ्यावर चिडलास
नेहमीप्रमाणे मग भूतकाळाने डाव तोच मांडला

का पुन्हा नियतीने उघडली तीच भयावह पाने
ज्यात माझ्या स्वप्नचा गाव जळताना मी पहिला

वाटते पुन्हा निघून जावे आपण त्याच वळणावरी
जिथुन नवा रस्ता आपणास प्रथम सापडला

नको तो रस्ता नको ती ओळख मन माझे घाबरते
या नव्या भावनेतही मग पुन्हा भूतकाळाचे भूत डोकावते

मन निघाले होते पुढती मागचा ठावही न घेतला
आयुष्याने मात्र पुन्हा डाव माझा तो रीक्त ठेवला
डाव माझा तो रीक्त ठेवला ...................................


केदार मेहेंदळे