माफ़ी चा अरजदार

Started by Tushar Kher, April 05, 2013, 11:27:41 PM

Previous topic - Next topic

Tushar Kher

जरी तू दिलेला त्रास निराकार आहे,
माझ्या जखमां ना  आकार  आहे !

त्यांचा झाडां वर अविश्वास आहे,
पक्षी पण आता खबरदार आहे !

उगाच नहीं तिकडे दिसतो धूर आहे,
बर्फा  खाली  लपलेला अंगार आहे  !

माझी नाही  त्य़ा  बद्दल तकरार आहे,
तुझे उगाच च रुसणे मजेदार आहे !

उगाच नाही झुकवलेली  मान आहे,
माफ़ी साठि चा मी  अरजदार आहे!

देवा  चरणी जरी माझा प्रणाम  आहे,
मनात माझ्या खरे तर  मूर्तिकार आहे !

तुषार खेर