संपवलंस ना सगळंच…

Started by टिंग्याची आई..., April 08, 2013, 09:19:45 AM

Previous topic - Next topic

टिंग्याची आई...

गेल्या २-४ दिवसात एका मुलाने कंपनीत आत्महत्या केली...  हा प्रकार जगाला नवीन नाहीये... पण पहिल्यांदा डोक्यात येत ते म्हणजे... त्याने अस करायला नको होत.... प्रश्न सगळ्यांनाच असतात... कदाचित त्याचा प्रश्न खूपच गंभीर असेल, कदाचित सुटलाही असेल त्याच्या सोबत तो प्रश्न.... पण मागे उरलेल्या आई बाबांचं, बायको अन पोराच काय... त्यांचा खरच काही दोष होता का?
अनेक प्रश्न... सगळेच अनुत्तरीत...

शेवटी संपवलंस ना सगळंच...
अवघ्या एकाच क्षणात...
सगळी गणित सोडवून मोकळा झालास...
तूच लिहिलेल्या त्या शेवटच्या पानात...

आयुष्याचा शेवट करून...
तुझा प्रश्न तू निकालात काढलास...
पण आयुष्यभर तुझ्यासाठी खपलेल्या बाबाचा...
जाता जाता नेमका कणाच मोडलास...

दोन ओळींची suicide नोट...
त्यांच्या किती प्रश्नांची उत्तरं देईल...
प्रश्न चिन्हानीच डबडबलेले डोळे...
त्यांची आयुष्यभर साथ देतील...

सोडून गेलास जिचा हात...
तिचं तर सगळ आयुष्यच कोसळलंय...
तुझ्या बरोबर पाहिलेलं तिचं एक एक स्वप्न...
तिच्याच विश्वासाच्या झालेल्या मातीत मिसळलय....

तिच्या डोळ्यातला थेंब अन थेंब विचारतोय...
का असा अर्ध्यावर सोडून गेलास...
तिच्या आयुष्याचा एकमेव आधार...
असा कसा न सांगता हिरावून नेलास...?

कुणी काय उत्तर द्यावं तूच सांग...
पिल्लाच्या "बाबा कधी येणार?" या प्रश्नाला...
कोण बर भरून काढेल आता...
त्याच्या आयुष्यातल्या या पोकळीला...?

अगदी शेवटच्या क्षणापर्यंत...
हा सगळा विचार केला असशील....
पण टाहो फोडणाऱ्या त्या आईला...
आता सांग परत कसा रे दिसशील...?

खरच इतका अवघड होता प्रश्न?
उत्तर सापडलंच नसतं का?
तुझ्या संपलेल्या Difficult Life पेक्षा...
आता घरच्यांचं आयुष्य खरंच सोप्प असेल का...?

वाटत.. तो एकच क्षण...
तू स्वतःला सावरायला हवं होतंस...
पिलाच्या चिमण्या डोळ्यांत...
फक्त एकदाच डोकावायला हवं होतंस...

तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं...
अगदी त्याच क्षणी तुला मिळाली असती...
Difficult का असेना पण सगळ्यांसोबत Life जगला असतास...
कदाचित...
बाप्पाच्या कृपेने तुझीसुद्धा नाव नक्कीच तरली असती....


- टिंग्याची आई (Shailja)
खरतर या गोष्टींचा बोलून आता काही उपयोग नाही पण तरीही... कुठेतरी हुरहूर आहे... त्याने असं करायला नको होत...
http://tingyaachiaai.blogspot.com

केदार मेहेंदळे

तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं...
अगदी त्याच क्षणी तुला मिळाली असती...
Difficult का असेना पण सगळ्यांसोबत Life जगला असतास...
कदाचित...
बाप्पाच्या कृपेने तुझीसुद्धा नाव नक्कीच तरली असती....



mast

मिलिंद कुंभारे