निवडणुकीचे दिवस आले!

Started by मिलिंद कुंभारे, April 10, 2013, 01:35:37 PM

Previous topic - Next topic

मिलिंद कुंभारे

निवडणुकीचे दिवस आले!

निवडणुकीचे दिवस आले
नदया नाले साफ झाले,
रस्त्यांवरच्या खड्ड्यांमध्ये
डांबर भरले गेले,
रस्ते सगळे नवे नवे,
मिरवणुकीने बहरले!

ते हात जोडलेले
अन मुखवटे हास्याचे,
कित्येक दिवसांनी
माझ्या दारी आले
अन
आश्वासनांची खैरात
वाटून गेले!

आता
जिकडे तिकडे चोहीकडे,
युद्ध फुंकले शब्दांचे!
रोज आरोप प्रत्यारोप
कसे नवे नवे!

निवडणुकीचे दिवस संपले!
पावसाने थैमान घातले,
वारे सारे सोसाट सुटले,
नदया नाले तुडुंब भरले,
साफ करण्या कुणी न आले,
रस्ते सारे झाले खड्डे खड्डे,
ते भरण्या कुणी न उरले,
छप्पर त्याचे उडून गेले,
सावराया त्याला कुणी न आले,
आश्वासने कसेच  फोल ठरले,
सगळे कसे अनोळखीच जाहले,
मग त्याने अभाळाशीच नाते जोडले,
अन मातिमधेच जीव त्यागले!

पुह्ना निवडणुकीचे दिवस आले,
त्याच्या आत्महत्येचे,
सगळ्यांनीच भांडवल केले,
पुन्हा तेच  आरोप प्रत्यारोप
रोज कसे नवे नवे!
अन युद्ध फुंकले शब्दांचे!

असे कसे ते दिवस रे,
आले, गेले, अन कधी संपले,
नाही कुणाच कळले,
पण
पदरी त्याचा सदैव उणे!


मिलिंद कुंभारे

केदार मेहेंदळे


मिलिंद कुंभारे


sweetsunita66

छान  । पांढऱ्या कपड्या वरील काळे डाग कुणाला दिसत नाही
        कधी दिसलेत तरी काय कराव हे गवसत नाही
       भोळ्या भाबल्या जनतेला फसवणे हेच त्यांचे काम असते
       प्रत्येक गरीब मत दात्याचा त्यांनी लावला दाम असते   :-X :-X :-X

मिलिंद कुंभारे

sweetsunita....

        पांढऱ्या कपड्या वरील काळे डाग कुणाला दिसत नाही
        कधी दिसलेत तरी काय कराव हे गवसत नाही
        भोळ्या भाबल्या जनतेला फसवणे हेच त्यांचे काम असते
        प्रत्येक गरीब मत दात्याचा त्यांनी लावला दाम असते


छान  ।

sweetsunita66


धन्यवाद मिलिंद  !!!!सत्य परिस्थिती आहे ही   :-X :-X

मिलिंद कुंभारे


Madhura Kulkarni

खरय...'राजकारण' हि आता शिवी बनवलेली आहे भ्रष्ट  नेत्यांनी.

मिलिंद कुंभारे


मिलिंद कुंभारे

#9
मधुरा ताई,
प्रतिसाद द्यायला सुरुवात केलीय वाटतं ...... आवडलंय...... :)
एवढ्या दिवसांनी ह्या कवितेला प्रतिसाद मिळाला म्हणून म्हटलंय ......