काट्याची पर्वा कुणाला आता !

Started by Vikas Vilas Deo, April 10, 2013, 08:59:47 PM

Previous topic - Next topic

Vikas Vilas Deo

काट्याची पर्वा कुणाला आता !
फुलेच काट्याप्रमाणे बोचतात आता !

विश्वास ठेवावा तरी कुणावर,
ज्यांच्यावर ठेवला विश्वास तेच घात करतात आता !

मित्र म्हणावे तरी कुणा कसे,
शत्रूसारखे मित्र वागतात आता!

कुणाच्या जावे शरण कुणा देव म्हणावे,
देवही दाणवाप्रमाणे भासतात आता !

उपकार न करावे कोणावरती ह्या जगतात,
जन्मदात्यालाही लोक विसरतात आता!

बाजार मांडला जातो,ठरते प्रत्येकाची किंमत.
ईमान, भगवान, ज्ञान, देहच नव्हे आत्म्यालाही लोक विकतात आता !

केदार मेहेंदळे



मिलिंद कुंभारे


Vikas Vilas Deo