माझ्या भावनांना

Started by Mangesh Kocharekar, April 10, 2013, 09:34:50 PM

Previous topic - Next topic

Mangesh Kocharekar


    माझ्या भावनांना
मी असतो मी नसतो  मी हसतो मी फसतो
माझ्याच सारखे अनेक असेच चटके सोसतो
मी गांगरतो ,मी बावरतो अन कधी कधी बिथरतो
मी गुणगुणताना मनातून मोकळाच बहरतो
           
माझ्या या भावनांना बराच अर्थ असतो

पण याच कारणास्तव मी ठार वेडा   ठरतो
     माझ्या जवळून जाणारा वाकडी वाट करतो
     माझ्याकडे पाहून तो मिश्किलपणे हसतो
     बहुदा त्याच्या लेखी मी बावळट  ठरतो   
     दूर निघून गेल्यावर तो पुन्हा वळून पाहतो
     मी किती शहाणा तो स्वतःला समजावत राहतो
     या कल्पनेतच तो  स्वतःला जोजावत हसतो
जग हे अशाच वेड्या खुळ्यांच म्हणून संसार चालतो
एक धवल ढगाला  काळा कुट्ट  मेघ हसतो   
वादळाला  झुला समजून आयत्या वेळी फसतो
विस्मृतीचा झटाका जाताच रिंगण सोडून नाचतो
                  कोचरेकर मंगेश