अरे वेड्या तू वेगळा झाला

Started by eknatha@rediffmail.com, April 14, 2013, 03:08:32 PM

Previous topic - Next topic

eknatha@rediffmail.com

अरे वेड्या तू वेगळा झाला

थकलेल्या गात्रांना
विचारांचे शिंपण दिल
त्यांनीच मग कात ओरबाडली
बघ.. कसा नवीन नवेला निखरून गेला

अरे वेड्या तू वेगळा झाला

मनाच्या वारू ला तबेल्यात बांधलं
स्वाराला मुक्त आंगण दाखवलं
त्यानीच तुला शून्यातून पूर्णत्व दिल
अस्तित्व तुझं सारखं त्यालाच चटावल

अरे वेड्या तू वेगळा झाला

तूच हिऱ्या ला पैलू पाडले
काळ्या कोळश्या तील रत्नांना घुमारे फोडले
प्रकाशात त्यांच्या आमचे डोळे दिपले
तुझ्यातल्या "तु"  ला तूच ओळ्खल

अरे वेड्या तू वेगळा झाला

रमाकांत
एकनाथा@रेडिफ.कॉम