सर

Started by shraddha.shinde.3990, April 15, 2013, 03:48:00 PM

Previous topic - Next topic

shraddha.shinde.3990

एक कवडसा कुठूनतरी हळूच डोकावतो
येताना मग सोबत श्रावण  आठवणीचा आणतो

एकाच सर पुढती येते सारे अंग शहारुनी जाते
जणू स्पर्शाने प्रियेच्या मन गाणे गावू लागते

साऱ्या  सरींनी बांध सोडणे हे मनाला उमजत नाही
सोबतीने मग मात्र भयाण एकटेपणा  आणते

एकांतात मग प्रियेची आठवण फारच सतावते
तोडून बंध सारे मन फुलपाखरा सारखे उडते

अचानक मग एक मिट्ट काळोख डोळ्य़ासामोरी  दाटतो
प्रियेच्या ओठीने मग तोच पुन्हा माघारी फिरतो

असाच एक श्रावण संध्याकाळी नजरेत स्मरतो
येतान सारे आठवणीचे गावच सोबती आणतो ................

Shrikant R. Deshmane

chan kavita shraddhaji..
keep it up.
best of luck 4 future.. :)
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

केदार मेहेंदळे


मिलिंद कुंभारे

खूपच छान!आवडलीय! :) :) :)

असाच एक श्रावण संध्याकाळी नजरेत स्मरतो
येतान सारे आठवणीचे गावच सोबती आणतो ................