"सखे तू "

Started by कौस्तुभ (मी शब्दवेडा), April 15, 2013, 11:48:35 PM

Previous topic - Next topic
           "सखे तू "

तुझ्या गुलाबी ओठांवर ओठ माझे
टेकताच, तू अलगद डोळे बंद करायचीस. अन माझ्या ओठांच्या मिठीत तू, ओठांबरोबर स्वत:ही हरवायचीस.

मधेच माझ्या ओठांतून तू,
ओठ तुझे सोडवायचीस.
अन लाजाळू सारखी लाजत हलकेच मान खाली घालायचीस.


लाजेने खाली गेलेली मान तुझी, मी हळूच वर उचलायचो.
अन् तुझ्या डोळ्यांवर आलेले ते केस बोटांनी हलकेच मागे सारायचो.

माझ्या नजरेला नजर देताना तू, सखे किती ग बावरायचीस. क्षणाचाही विलंब न करता तू, माझ्या मिठीत शिरायचीस.

© कौस्तुभ

केदार मेहेंदळे

chan kavita ahe...pan alignment thik karayla haviy...

मिलिंद कुंभारे

#2
 छान! :) :) :)

"सखे तू "

तुझ्या गुलाबी ओठांवर ओठ माझेटेकताच,
तू अलगद डोळे बंद करायचीस.
अन माझ्या ओठांच्या मिठीत तू,
ओठांबरोबर स्वत:ही हरवायचीस.

मधेच माझ्या ओठांतून तू,
ओठ तुझे सोडवायचीस.
अन लाजाळू सारखी लाजत
हलकेच मान खाली घालायचीस.


लाजेने खाली गेलेली मान तुझी,
मी हळूच वर उचलायचो.
अन् तुझ्या डोळ्यांवर आलेले ते केस
बोटांनी हलकेच मागे सारायचो.

माझ्या नजरेला नजर देताना तू,
सखे किती ग बावरायचीस.
क्षणाचाही विलंब न करता तू,
माझ्या मिठीत शिरायचीस.

कौस्तुभ (मी शब्द वेडा)

rudra

 :) :) :) :) :) nakki kay hota asel yachi janiv zhali mala....
chaan ahet oli...


#4
tanks all of u

मिलिंद कुंभारे

कौस्तुभजी तुमची कविता मी वर alignment करून दिलीय कि?  :) :) :)
ह्यालाच alignment म्हणतात! सगळ्या ओळी एकाखाली एक लिहा!
शक्यतो ओळी छोट्या छोट्या असाव्यात!

मिलिंद कुंभारे