मराठमोळी तू!

Started by मिलिंद कुंभारे, April 17, 2013, 01:31:43 PM

Previous topic - Next topic

मिलिंद कुंभारे

मराठमोळी तू!

मराठमोळी तू गं!
जशी सौंदर्याची खान गं!

गळ्यात शोभती  एकदाणी,
अन पायांत वाजती पैंजण,
जणू छेडती धुंद मधुर सूर गं!
भरजरीचा हिरवा शालू,
अन डोळें मिटून लाजणं,
गालांवर हंसू गोड गं!
कपाळी शोभती लाल कुंकू,
सौभाग्याचं मुकुट जणू !
नाकामध्ये
नथ मोत्यांची,
जशी शोभशी,
चंद्राची तू चांदणी!
काळ्याभोर केसांमध्ये
गुंफती गजरा मोगऱ्याचा,
दरवळीत गंध,
मराठमोळ्या मातीचा!
भाव भोळे चेहऱ्यावरती,
अन प्रीत तुझी,
अमृतापरी गोड गं!
मन तुझे,
फुलांपरी कोमल गं!
आभाळागत माया तुझी,
जशी भर उन्हांत,
सावलीचा अंश गं!

मराठमोळी तू गं!
जशी सौंदर्याची खान गं!

मिलिंद कुंभारे

मला श्रुंगारिक कविता लिहायला जमत नाहि. पण मी मराठी लेख ह्यात "मराठी मुली" हा लेख वाचला आणि मला हि कविता लिहावसं वाटलं!
ह्यात त्रुटी असल्यास किंवा एखादा श्रुंगार जोडायचा राहिला असल्यास अवश्य कळवा!



Milind sir
me navinach kavita lihayla lagloy tari
mala je vatatay te me sangto

Mala ass vatatay ki kavita tumhi shrungar (make up) yavar keliy
pan Shrungarik kavitan chya prakara madhye Stree ani purushan madhye asanarya pranaya chi kavita karaychi asate

मिलिंद कुंभारे

कौस्तुभजी :)
असेलही कदाचित! पण स्त्रीच्या श्रुंगारावर कुठे कविता लिहायची!
मी हि कविता फक्त एका "मराठी मुली" या MK वर लिहिल्या गेलेल्या लेखावर प्रतिक्रिया म्हणून लिहिलीय!
अभिप्रायाबद्दल धन्यवाद!!! :) :) :)

केदार मेहेंदळे


मिलिंद कुंभारे

Kedar dada!

अभिप्रायाबद्दल धन्यवाद!!!  :) :) :)


मिलिंद कुंभारे


कौस्तुभji!!!
धन्यवाद!!! :) :) :)

अशोक भांगे (सापनाई कर )

milindji tumhi kavita kontya prakaraamadhe lihili(type keli) ahe,
yaachya peksha tumhi evadh sundar warnan kelay he khup chhan barakaaa.
     (sorry for spelling mistake)

मिलिंद कुंभारे


मिलिंद कुंभारे

कविता थोडीशी एडीट केलीय ... आवडतेय का बघा ...  :)