कविता खरच जगण्यासाठी आवश्यक आहेत का?

Started by vishal Kulkarni, April 17, 2013, 07:53:38 PM

Previous topic - Next topic

vishal Kulkarni

आज आपल्याला कोणी हक मारली तर वळून बघावे इतकाही वेळ नसल्यासारखे आपण वागत आहोत. आपले जवळच्या मित्रांशी , घरातल्या लोकांशी संवाद साधायला आपल्याला शब्द शोधावे लागत आहेत. आपण चांगले सिटीझन्स बनण्याचा प्रयत्न  न करता नेटिझन्स म्हणून शेखी मिरवण्याचा प्रयत्न करीत आहोत. एखादी पूर्ण ओळ टाईप करायला नको म्हणू शॉर्ट मेसेजेस  पाठवीत आहोत. प्रत्येक भावनेच आपण एक नि:सत्व बोन्साय करून टाकलेल आहे. अशा वेळी एखादी कविता वाचणे , तिचा अर्थ ह्र्दयापर्यंत नेणे इतक संवेदनशील मन आपण ठेवल आहे का? म्हणूनच माझा एक छोटासा प्रश्न आहे आजच्या काळात कविता जगण्यासाठी खरोखरीच आवश्यक आहेत का?.

rudra

ho aahe....aplya manat kay rujla ahe te baher yenyasathi...
vicharancha chakanna veg milnyasathi...
gat athvanina ujala yenyasathi...
komejalelya manana umalnyasathi...
padun punha ladhanyas uthanyasathi....
asvanche shabdh umthavnyasathi...
prmachi tahan shamavnyasathi...
mayechi bhuk jagavnyasathi...
melelyana jagavnyasathi...
ani,julmalelyana..hasavnyasathi...
                                                  rudra...

आजच्या काळात कविता जगण्यासाठी खरोखरीच आवश्यक आहे....


केदार मेहेंदळे

विशाल मित्रा...

तु लिहिलेले विचारच तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतत. तू लिहितोस "आज आपल्याला कोणी हक मारली तर वळून बघावे इतकाही वेळ नसल्यासारखे आपण वागत आहोत. आपले जवळच्या मित्रांशी , घरातल्या लोकांशी संवाद साधायला आपल्याला शब्द शोधावे लागत आहेत. "...... अगदी बरोबर. पण म्हणूनच कवितेची गरज आहे. मी तरी कविता दोन गोष्टींकरता लिहितो.

१) माझं मन मोकळ करण्या साठी.

आपल्या मनात जे विचार येतात, भवतालच्या गोष्टी बघून आपल्याला जे वाटत ते कोणा कडे बोलावं  तर एकतर  कोणाला ऐकायला वेळ नाहि. आणि असला तर आपण बोलताना तो शांतपणे ऐकून घेईल अशी सुतराम शक्यता नहि. तेच लिहिण्याच्या बाबतीत निदान आपली विचार शृंखला तरी तुटत नहि हा फायदा आहे आणि आपले विचार लिहून झाल्यावरच इतर लोक वाचतात त्या मुले आपल्याला जे म्हणायचं आहे ते नीट लिहील जात.

२) लोकांना काहीतरी देण्या साठी.

माझ्या लिहिण्यातून कोणाच्या विचारणा दिशा मिळत असेल, कोणाला विरंगुळा मिळत असेल, कोणाच्या जुन्या आठवणी ताज्या होऊन त्याला समाधान मिळत असेल तर चांगलेच नाही का?  हि सुध्धा एक प्रकारची समाजसेवाच आहे अस मी मनतो.

तू म्हणतोस कविता वाचायला कोणाला वेळ आहे का? मी विचारतो असं वाटण्याचं  करणाच नहिये. लोकं पेपर वाचतायत, टीव्ही बघतायत, पुस्तकं वाचतायत तशाच कविताही वाचतातच. कविता वाचणारे कमी असतील कारण एकतर हा आवडीचा प्रश्न आहे आणि कवितेची आवड आपल्यात जाणूनबुजून कधी रुजवण्यात आलीच नहि.

आता कविताच का? तर हा ज्याच्या त्याच्या कमफरटचा प्रश्न अहे. कोणाला लेख लिहिण कमफरटेबल वाटत कोणी कविता करतं. पण आपण त्यातून आपल मनच मोकळ करत असतो.

म्हणून मित्रा. असा विचार करू नकोस... उचल बोट आणि लाग टाइप करायला.... बघ नक्की एक छान कविता तरी बनेल किंवा एखादा छान लेख, गोष्ट काही तरी बाहेर येइल.


केदार.... 

मिलिंद कुंभारे

#3
कविता म्हणजे चार ओळींमध्ये अख्खं भावविश्व सांगण्याचे एक माध्यम!

आपल्या कडे वेळ खूप कमी असतो म्हणून आपण netizen बनत चाललोय!
मग आपण kavizen का बनत नाही?

बहिणाबाई नी तिच्या दोन ओळींमध्ये जन्म अन मृत्यू मधलं रहस्य कसं सहज सांगितलं बघ!
"अरे जगणं मरण , एका स्वसाच रे अंतर"

मला वाटतं कविता हि जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा, यासारखी आवश्यक नसेलही कदाचित
पण जसे रुद्र सांगतो तसे कविता म्हणजे जगण्यासाठी, जीवनाचाच एक घटक नक्कीच असावी!

कविता खरच जगण्यासाठी आवश्यक का तर ......

मनातले भाव सहज व्यक्त करण्यासाठी ...
विचारांना गती मिळण्यासाठी ......
गत आठवणींना उजाळा मिळण्यासाठी ...
कोमेजल्या मनाला उमलण्यासाठी ......
गोठलेल्या शब्दांना बोलण्यासाठी ......
मनातले प्रेम व्यक्त करण्यासाठी ......
कुणालातरी हसवण्यासाठी ......
कुणालातरी सावरण्यासाठी .......


मिलिंद कुंभारे

अशोक भांगे (सापनाई कर )


vishal Kulkarni

मित्रानो तसा तो प्रश्न मी मलाच विचारल्यासारखा होता. आणि तुमची सगळी उत्तरही माझ्या मनातही होतीच. कविता मलाही सुचतात , अगदी मोठमोठ्या नसल्या तरी काही ओळी सुचतात. पण अलीकडे त्यांची मला जास्तच ओढ वाटू लागली आहे. बऱ्याच आधी वाचलेल्या कविता पुन्हा नव्याने ओळख दाखवू पाहत आहेत. आपले अंतरंग अधिक उघड करताहेत..

swara

 मला अस वाटत कि, आपल्या मनातल्या भावना कोणासमोर बोलून दाखवण्यापेक्षा कवितेमार्फत जास्त खुलून येतात. आपल दुखः  जगासमोर मांडण्यापेक्षा एखादी कविता रचून पोस्ट  केलेलं काय वाईट ?
विशाल सर, खूप छान मुद्दा निवडलात जिथे दोन गोष्टी शेर करायला मिळाल्या...... :)