विरह-प्रेम पराकाष्ठा

Started by अशोक भांगे (सापनाई कर ), April 18, 2013, 08:42:06 PM

Previous topic - Next topic

अशोक भांगे (सापनाई कर )

विचारांच्या वादळात वाट हरवत चाललो ,
प्रेमाचे ते गाव आता विसरत मी चाललो .
मायेच्या या जगात मी एकटा राहिलो ,
तू गेलीस आता  प्रेम तुझे मी फक्त आठवत राहिलो.

न कळे मज भाषा हि समाजाची ,
प्रेमाचे गीत तुझे या ओठावरती गात राहिलो.
न काळ  आणि वेळ आता ,
प्रेमरूपी मृगजळ आता मी शोधत राहिलो .

घे समजुनी मज मनीच्या भावना प्रिये,
जा अशी दूर तू आता प्रिये ,
समोर पाहुनी तुला ,
उगाच वाटते पुन्हा तू भेटशील मला .

प्रेमाच्या या नावेवरती कसा होऊ स्वार आता ,
विरहाच्या सागरात करू विहार किती आता .
मज स्वप्नीची स्वप्नपरी ,
चल विलग होऊ आता .

                                अशोक भांगे (सापनाई कर )

केदार मेहेंदळे


rudra


अशोक भांगे (सापनाई कर )