निवृत्ती जवळ l

Started by विक्रांत, April 19, 2013, 07:05:05 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

निवृत्ती जवळ l
बसता केवळ l 
निवे सारा जाळ
अंतरीचा   ll १ ll
अभंग हरिपाठ l
विणेकरी गात l
अर्थ हृदयात l
उमलला ll२ ll
समाधी दर्शन l
दृढ आलिंगन l
जाहली संपूर्ण l
तीर्थयात्रा ll३ ll
पावला शंकर l
श्री त्रंबकेश्वर l
नाथपदा वर l
मज पुन्हा ll ४ ll

विक्रांत प्रभाकर

केदार मेहेंदळे