मलाही प्रेम करावेसे वाटते

Started by kuldeep p, April 21, 2013, 07:58:07 PM

Previous topic - Next topic

kuldeep p


तुला बघून मलाही प्रेम करावेसे वाटते
नेहमीच चेहऱ्यावर तुझ्या स्मित हास्य असते
तुला बघून मलाही हसावेसे वाटते
तुला बघून मलाही प्रेम करावेसे वाटते
दुसऱ्याशी बोलताना नकळत माझ्याशी बोलते
तुझ्या त्या बोलण्यामधून नेहमीच भुरळ पाडते
तुला बघून मलाही प्रेम करावेसे वाटते
तुझ्याशी बोलणे मलाही आवडते
असे असूनही मला ते टाळावे लागते
तुला बघून मलाही प्रेम करावेसे वाटते
नाही आवडत दुसऱ्याने तुझ्याशी प्रेमाने बोलणे
तुझ्याजवळ येउन नको ते इशारे करणे
कारण
तुला बघून मलाही प्रेम करावेसे वाटते
 

Chetan Thakare

जसे आभाळाच्या भोवऱ्यात ढग कसे दाटते
मला ही तुला बघून प्रेम करावेसे वाटते

नकळत पणे तुला चार चौघात लापून बघावेसे वाटते
का कोणास ठाऊक मला ही तुला बघून प्रेम करावेसे वाटते


खूप सुंदर मित्रा keep it up  :P

http://www.facebook.com/chex.thakare

kuldeep p


rudra