फक्त तु हवीस...

Started by Ankush S. Navghare, Palghar, April 22, 2013, 01:43:43 AM

Previous topic - Next topic

Ankush S. Navghare, Palghar

कधीतरी असेच
भरून येते मनांतरी
जरी कळत नसले
जीव जळतो अंतरी
अशावेळी वाटते
असावे कुणीतरी
नाही जरी जवळ
दूरवरच कुठेतरी
मन विचार करते
कुणीतरी आठवते
पण सारखी तुझीच छबी
मनामध्ये अवतरते
मनाची समजूत
मनच काढू शकते
प्रेमाची ओळख
प्रेमच करू शकते
पाहुनी स्वप्नी तुला
वेळ तर जातो
पण कुठल्यातरी विचाराने
जीव सतत जळतो
नाती मनात ठेऊन
फक्त जगता येते
पण जगणारा मात्र
रोज रोज मरतो
आता स्वप्नांत जगणे नको
जीवनात तु यावीस
नको स्वप्न तुझे
फक्त तु हवीस
फक्त तु हवीस...

...प्रांजुन्कुश
... Prajunkush.

rudra

 :) mitra thodasa space hava hota....
nice poem...

Ankush S. Navghare, Palghar

खुप आभारी आहे मित्रा...

मिलिंद कुंभारे

छान आहे कविता!

आता स्वप्नांत जगणे नको
जीवनात तु यावीस
नको स्वप्न तुझे
फक्त तु हवीस
फक्त तु हवीस...


ओळी आवडल्यात! :)

Ankush S. Navghare, Palghar