चारोळ्या ---

Started by SANJAY M NIKUMBH, April 22, 2013, 10:06:13 AM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

चारोळ्या ---

---------------------

खर प्रेम असल्यावर

मनात वासना येत नाही

शरीर स्पर्शाची मनास

गरजही वाटत नाही

---------------------------------------

दूर असूनही आपण

एकमेकांत विरघळलेले

प्रेम म्हणजे काय

खऱ्या अर्थानं कळलेले

---------------------------------------

प्रेमाचं जग खरचं

खूप सुंदर असतं

खऱ्या अर्थानं जगणं

बेधुंद करत असतं

---------------------------------------

प्रेमात काय हवंय

याचा विचार करायचा नसतो

प्रेमाला काय हवंय

हाच विचार करायचा असतो

-----------------------------------------

प्रेम भरभरून देतं

ते घेता आलं पाहिजे

एकदा मनी उमलल्यावर

नातं टिकवता आलं पाहिजे

-----------------------------------------

संजय एम निकुंभ , वसई
 


अशोक भांगे (सापनाई कर )


मिलिंद कुंभारे

प्रेमाचं जग खरचं

खूप सुंदर असतं

खऱ्या अर्थानं जगणं

बेधुंद करत असतं

छान कविता आहे! आवडली! :)

kuldeep p

थोडी मजा थोडं टेंशनही असतं

लपून छपून भेटण्यातच मजा असतं

तुझे किवा माझे , कोणा एकट्याचे नसतं

प्रेम तर दोन मनांचं मिलन असतं
 

मिलिंद कुंभारे

प्राजदीप! छान!

तुझं किवा माझं, कोणा एकट्याचं नसतं

प्रेम तर दोन मनांचं मिलन असतं   
:) :) :)

rahulGHDR

म्हणतात प्रेमात सगळ माफ़ असत
पण अस कधी होत नसत................
.
.
.
जग सार हसत असत .....
दोघांच मन  मात्र रडत..................

मिलिंद कुंभारे

खरं कि रे बाबा!!!! :( :( :( :'(