खोट्या प्रेमावरची वेडी आशा

Started by Shona1109, April 22, 2013, 03:21:15 PM

Previous topic - Next topic

Shona1109

                             खोट्या प्रेमावरची वेडी आशा

खूप वर्षांनी ते दोघे  भेटलेले
भेटण्यापेक्षा अचानक समोरासमोर आलेले
क्षणात एकमेकांची नजर एकमेकात भिडलेली
काही वेळासाठी  एकमेकांमध्ये हरपलेली
आजुबाजूच त्यांना काहीच राहील  नव्हत भान
त्या एका क्षणामध्ये सर्व काही घडलेलं
रेल्वेचा सिग्नल सुटलेला तो रोजच्याप्रमाणे पुढे गेलेला
ती मात्र तिथेच खिडकीपाशी एकटक बघत बसलेली
डोक्यातल्या विचारांची चक्रे भूतकाळात मोडलेली
हो....तोच होतो तो
ज्याच्यावर आपण जीवापाड प्रेम केलेलं
ज्याच्यासाठी आपण सर्व काही सोडलेलं
त्यानेही तेव्हा लग्नाच्या वचनात अडकवलेल
आयुष्यात सुखी ठेवण्याच स्वप्न मोठ दाखविलेल
मी मात्र त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकत गेलेली
त्याने दाखवलेल्या स्वप्नांवर  डोळे बंद करून विश्वास ठेवत गेलेली
पण त्याचा हेतू मात्र वेगळाच होता
माझ्या पैशाच्या जोरावर त्याला चंद्र गाठायचा होता
त्याला नाही अडकायचं होत संसाराच्या जाळ्यात
नाही जपायची होत वचनांची गाठ
त्याच माझ्यावर प्रेम कधीच नव्हत
ते फक्त माझ्याजवळ असलेल्या पैशावरच होत
आयुष्याच्या वाटेवर अर्धवट हाथ सोडून
माझ्या गर्भात इवलस पिल्लू ठेवून तो कायमचाच गेला होता
मी मात्र त्याला थांबवू नाही शकली
कारण त्याच्या खोट्या प्रेमावर अजूनही विश्वास ठेवत होती
उगाच पोरीला बाबा येण्याची खोटी आशा दाखवत होती
तिला काय माहित तिचा बाबा कसा आहे
त्याला तर त्याच्या पोरीचा कधीच नव्हता उभारा
नाहीतर तो अस आपल्याला एकट टाकून गेला नसता
आजही तो नेहमीसारखा पाठ फिरवून गेलेला
आणि मी वेडी त्याच्या येण्याची वाट बघत बसलेली