एकतर्फी प्रेम

Started by अशोक भांगे (सापनाई कर ), April 23, 2013, 02:47:07 PM

Previous topic - Next topic

अशोक भांगे (सापनाई कर )


तुला त्याची किंमत नसेल कदाचित ,
पण आशा नसतानाही लढण सोप नसत ग ,
तुझ्यासाठी फक्त एक विनोद असेल ,
पण एकतर्फी प्रेम करण सोप नसत ग .

तासंतास तुझ्या एका नजरेची वाट पाहन ,
एक झलक मिळाली तर जस देव पावन .
चुकून हसलीस तर वेडच होऊन जाण ,
मग रात्र काय आणि दिवस काय ,
झोपेच काम फक्त जागत राहण .
मग मनाला खूळ ठरवून सारा दोष त्याचावर ढकलून ,
स्वतःची समजूत काढण .
        सोप नसत ग ......
तुझ्याच विचारण डोक घोटाळण ,
एका स्वप्नाच्या मागे बाकी सगळी ध्येय अर्पण करण .
एका आशेमाग जीव कुरवाळण ,
रागच कारणही तूच ,
विचारातही तूच ,
स्वप्नातही तूच,
देहातही तूच ,
एकमात्र आशा त्या आशेतही तूच .
मग एकांतातही एकट राहण सोप नसत ग ......

काळजी करणाऱ्यांशी खोट बोलन ,
मित्रांची नजर चुकवण ,
सतत एकच प्रयत्न हा वेडेपणा लपवण ,
पण या डोळ्यांना कस रोखायच ,
यांच काम फक्त मला वेड ठरवण .
कोणाची दया,
कोणाच हास्य ,
कोणाची चीड ,
लोकांची करमणूक बनन ,
  सोप्प नसत ग ......

सन्मान , इज्जत, अब्रू , अहंकार
हे शब्द ,
हो शब्दच ना ,
कोणाच्या पायाशी अर्पण करण .

हास्य होईल ओठांवर स्वार ,
कि लागेल अश्रूंची धार ,
हे ठरवण्याचा हक्क दुसऱ्याला देन
सोप नसत ग ......

तुझा तिरस्कार करण्याचा प्रयत्न करण ,
रोज स्वतःलाच ठणकावून सांगण ,
वेड्यासारख स्वतःच काहीतरी ठरवून घेण ,
रोज सकाळी एक दृढ निछय करण आणि
निजण्याआधी पुन्हा त्या मोबाईलमध्ये तुझ्याच मेसेज्ची वाट पाहन ,
  सोप नसत ग ......

डोंगराएवढ स्मितहास्य ओठांवर झेलण ,
मैफिलींच्या गर्दीत ,
लोकांच्या गराड्यात एकट राहाण
एकांतात स्वतःची सोबत नकोशी वाटण ,
मनांच्या जखमांना स्वतःच दगडाने ठेचण ,
अश्रू संपेपर्यंत रडण आणि अश्रूही सोडून गेले म्हणून पुन्हा जीव तोडन
     सोप नसत ग ...।

कळेल ग तुला खूप अवघड असत ,
एकतर्फी प्रेम करण .
तुला त्याची किंमत नसेल कदाचित ,
पण आशा नसतानाही लढण सोप नसत ग . 

   Author: Unknown

केदार मेहेंदळे

#1
http://www.youtube.com/watch?v=OICxhnFvZzg

copy pest this link in browser
Author as per you tube Santosh Mane