मनांत दुःख..

Started by Sadhanaa, April 27, 2013, 05:10:40 AM

Previous topic - Next topic

Sadhanaa

मनांत दुःख असूनसुद्धा
  तोंडभर हंसावं लागतं
विरक्तता वाटून सुद्धां
  जगांत वावरावं लागतं ।
अंगात त्राण नसुन सुद्धां
  उसनं बळ आणावं लागतं
आल्या गेल्याचं स्वागतही
  हंसतमुखानं करावं लागतं ।
डोळ्यांमध्ये झोप नसतां
  नुसतं पडून रहावं लागतं
जीवनाचं भयाण स्वप्नं
  उघड्या नेत्री पहावं लागतं ।
भावना मरून गेल्यातरी
  कर्तव्य पार पाडावे लागतं
मरण येत नाहीं म्हणून
  नाईलाजानं जगावं लागतं ।। 
                                             रविंद्र बेंद्रे
कविता चित्ररुपात पहायची असल्यास ...
Please click on this
http://www.kaviravi.com/2013/04/sad-poem_26.html

मिलिंद कुंभारे

अप्रतिम!!!

मनांत दुःख असूनसुद्धा
  तोंडभर हंसावं लागतं

मरण येत नाहीं म्हणून
  नाईलाजानं जगावं लागतं ।।