एकाकी जीवनांत...

Started by Sadhanaa, April 28, 2013, 10:48:46 AM

Previous topic - Next topic

Sadhanaa

एकाकी जीवनांत ह्या
वाट कुणाची बघतोस
कुणी येईल म्हणून
आशा कां धरतोस
एकदा गेलेला साथी
परत कधीं येत नाहीं
जीवनांत त्याची उणीव
भरून कुणी काढत नाहीं
सत्य हे निसर्गाचे
जाणून कुणी घेत नाहीं
एकाकी पणा घालविण्या
म्हणून तें करिती घाई
कुणी शोधती साथीला
अनेक भजती देवाला
तेही जमत नाहींत तें
शरण जाती मदिरेला
प्रकार सारे करूनही
तहान काहीं भागत नाहीं
जीवनांतील हा एकांत
दूर कधी होत नाहीं
रविंद्र बेंद्रे
कविता चित्ररुपात पहायची असल्यास ...
Please click on this
http://www.kaviravi.com/2013/04/miscellaneous_27.html