काळ्याशार मेघांनी...

Started by Sadhanaa, April 30, 2013, 12:26:12 AM

Previous topic - Next topic

Sadhanaa

काळ्याशार मेघांनी

   सूर्यबिंब झांकून टाकले

रागाने लाल झाला तो

   कारण पृथ्वीदर्शन नाहीं घडले ।

फाटलेल्या ढगाआडून

  डोकावून तो पाहूं लागला

भेग पडली एक पाहून

  दुसरा मेघ आड आला ।

रागावून मग तावाने तो

  इंद्राच्या दरबारी गेला

मेघाविरुद्ध त्यांने तेथे

  देवाकडे दावा केला ।

देवादिदेवा पाठवून द्या

  त्वरेनं अपुल्या पवनाला

दूर कुठे हांकून द्या

  दुष्ट नादान मेघाला ।

अनावर राग सूर्याचा

पाहून इंद्र मनीं हसला

सभोवार नजर टाकून

  शांतपणे तो बोलू लागला ।

मेघ निर्माण केला कुणी

  जबाबदार ना तूं त्याला

हांकून लावण्या सांगशील कां

  स्वयं निर्मित दुर्दैवाला ।

खेळ तुझा घातकी पाहून

  पवन दूर निघून गेला

आतां तो येईपर्यंत

  वाट त्याची हवी पहायला ।

श्रावणांत पवन येईल

  तेव्हां मी सांगेन त्याला

तो पर्यंत मेघाचा त्रास

  तुला हवा सोसायला ।

श्रावण मांस पुरा लागेल

  पाडाव मेघाचा करण्याला

मग भाद्रपदांत तूं जा

  पुन्हां पृथ्वीस भेटायला ।

ऐकून बोल इंद्राचे

  सूर्य मनीं कळवळला

परंतु वाट पाहण्याविना

मार्ग नाहीं काहीं उरला ।।

                        रविंद्र बेंद्रे 
कविता चित्ररुपात पहायची असल्यास ...
Please click on this
http://www.kaviravi.com/2013/04/miscellaneous_29.html

मिलिंद कुंभारे

मेघ निर्माण केला कुणी

  जबाबदार ना तूं त्याला

हांकून लावण्या सांगशील कां

  स्वयं निर्मित दुर्दैवाला ।

apratim!!! arthapurna!!! Chan!!!

rudra