ती बाई एका रातीची……

Started by rudra, April 30, 2013, 10:04:44 AM

Previous topic - Next topic

rudra

उघड्या देहाची अन
काळवंडलेल्या व्यथेची
ती पोरकी आपुलकीच्या नजरेची,
की, वेश्येच्या जाणीवेची....   
ती बाई एका रातीची.......

परी म्हणू की,
चंद्रमुखी तिला...
ती,भुकेल्या पारधी बापाची.
घायाळ....ओरबाडलेल्या वासनेची...
ती बाई एका रातीची.......

वेदनेची माऊली  म्हणा,
जशी निरभ्र प्रेमाची साऊली.
उपभोगाची रातराणी,
पहाटपारी  दरवळणारी...
ती बाई एका रातीची.......
                                - रुद्र

मिलिंद कुंभारे

ती,भुकेल्या पारधी बापाची.
घायाळ....ओरबाडलेल्या वासनेची...
ती बाई एका रातीची.......

chan!!!


केदार मेहेंदळे


nilesh9226

जेव्हा तहान भागते तेव्हा पाण्याला सगळेच विसरतात
पण हेच पाणी त्यांची तहान भागवते हेच का सगळे विसरतात

rudra

kharay mitra..
ratriche 2.30 vajle hote..mi eka chaha chya taprivar chaha pit astana....
suchleli hi kavita aahe...far kahi lihaych hota pan thodkyatach sampavl.....