ओझं

Started by swatium, April 30, 2013, 11:13:39 PM

Previous topic - Next topic

swatium

विरले भोवरे शमल्या वादळात
मनसागरात निजल्या खवळल्या लाटा
लक्ष,अब्ज ... शांत स्तब्ध ,
गुंडाळले बासनात भूतकाळाच्या
तत्व हट्ट , सारे ,
जगासमोर वाघ झालं
काळीज माझं
मात्र ... ते
तुझ्या डोळ्यात वितळलं
मऊ ,हळव्या लोण्यागत भाबडं
सरलं मीपण सारं
पण आता
माझेच कलेवर माझ्याच खांद्यावर
ओझं झालं !
...............स्वाती मेहेंदळे

rudra

माझेच कलेवर माझ्याच खांद्यावर
ओझं झालं

chan ahet vakya rachana