उत्कट प्रेम...

Started by Sadhanaa, May 01, 2013, 08:47:47 AM

Previous topic - Next topic

Sadhanaa

उत्कट प्रेमाच्या भावनेनं
ताजमहाल बांधला गेला
भव्य-सुंदर वास्तुचा
त्यामुळेच जन्म झाला
शहाजहांच्या प्रेमाचे
वर्णन लोक करत होते
अथक दृष्टीनें आणि
ताजकडे पहात होते
पहात होते पूर्वीही
अजूनही पहात आहेत
भारवलेल्या मनानं
त्याचे वर्णन करत आहेत
भावना पाहून लोकांच्या
सरकारने संधी साधली
ताजमहाल पहाण्यासाठी
रुपयांमध्ये  फी लावली
रुपयांमध्ये फी लावून
गल्ला ते भरत आहेत
शहाज हां च्या प्रेमाचा जणुं
लिलावच करत आहेत
पाहून हा लावला कर
तो कष्टी ही झाला असेल
प्रेमाचे विडंबन पाहून
तो अश्रूं ढाळीत असेल
प्रेमाचे वा सौंदर्याचे
त्यांना सोयरे सूतक नाही
म्हणूनच कर बसविण्याला
मागें पुढे पाहिले नाहीं
आज ताज ,उद्या चर्च
परवा मंदीर त्यांत आले
कर बसवून सर्वांवर
निधर्मांचे हीत साधले
आता फरक एक झाला
भगवान,येशू आणि अल्ला
ह्यापुढे मात्र तो
फक्त श्रीमंताचाच झाला
गरिबी हटाव की जय
जय निधर्म जय बोला
पायावर मारून घ्या
आपल्याच कुऱ्हाडीचाच टोला
रविंद्र बेंद्रे
http://www.kaviravi.com/2013/04/miscellaneous_30.html

rudra