Love at first sight!!!

Started by मिलिंद कुंभारे, May 01, 2013, 03:42:20 PM

Previous topic - Next topic

मिलिंद कुंभारे


Love at first sight!!!

आपण नेहमी सिनेमा मध्ये किंवा कथा, कादंबरी मध्ये बघतो, वाचतो......बघताक्षणी कुणीतरी कुणाच्या प्रेमात पडतं ....... पण खरच का ते प्रेम असतं! ......। कि असतं ते फक्त आकर्षण .........क्षणिक .........कि असतं ते एक मृगजळ .......... जे कालांतराने होतं निर्जळ !!!!

ती तिच्या एका कवितेत लिहिते .......... तिचे एका अनोळखीवर? प्रेम जडले!!!......... काही दिवसांनी ती दुसरी कविता लिहिते....... माझ्या उदरात तुझा अंश वाढतोय ............. कधीची वाट बघतोय तुझी ......... परत कधी येणार रे माझ्या सख्या ???.......... का असंच असतं Love at first sight???

कधी कधी हे प्रेम नुसतंच एकतर्फी असतं ......... त्यातून साहजिकच कुण्या एकाचा प्रेमभंग होतो ......... अन वर्तमानपत्रात बातमी छापून येते ......... एका मुलाने एका मुलीवर ACID फेकले......... किंवा एका मुलीने त्याने प्रतिसाद दिला नाही म्हणून आत्महत्या केली !!!.......... का असंच असतं Love at first sight???

आपण २१ व्या शतकातले तरुण/तरुणी असंच नकळत कुणावर तरी प्रेम? करतो .......... मग हळूहळू एकमेकांत गुन्ततो...... अन गुंता जास्तच वाढला कि आयुष्यभर रडत बसतोय!!!

मग प्रेम हे असं Love at first sight असावं कि असावं ते एक बंधन ......... जिथे प्रेम आपसूकच जडतं ......... दिवसेंदिवस हृदयात खोलवर रुजत जातंय ......... ते प्रेम असतं मुरलेलं , मुराब्ब्यासारखं अविट.......... गोड ......... चिरतरुण ......... निर्मळ !!!!

मला वाटतं हा एक आजच्या तरुण पिढीसाठी गंभीर चर्चेचा विषय असून त्यावर चिंतन करणे खूप गरजेचे आहे!!!

रसिक मित्रानो आपण सगळेच कधीतरी कुणाच्यातरी प्रेमात पडतोच !!! आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिया येथे अपेक्षित आहेत!!!

चार मिनिटांचा सहवास,
चाळीस वर्षांचा प्रवास,
गुंतलंय मन तिच्यात,
अजूनही  बघतोय वाट,
देशील  का तू मला साद!


मिलिंद कुंभारे

Maddy_487

Kharach vichar vhayala hawa hya goshticha.

मिलिंद कुंभारे

Maddy_487

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!!

विक्रांत


मिलिंद कुंभारे

ह्याचा सखोल अभ्यास व्हायला हवा!  :( :( :(

विक्रांतजी धन्यवाद!!

SWEETSUNITA

tuzya baryach kavita wachalya.....khup chhan lihita.abhinandan....

मिलिंद कुंभारे

SWEETSUNITA!!!

प्रशंसेबद्दल मनापासून धन्यवाद!!!! :) :) :)


RAAHUL

khar tar ya vishayavar bolu titka kami aahe...pan mala vatat JASHI DRUSHTI TASHICH SHRUSHTI.....apla likhan khuapch aavadla...