तू नसतेस न बरोबर

Started by Maddy_487, May 01, 2013, 06:03:24 PM

Previous topic - Next topic

Maddy_487

काय सांगू,

हल्ली झोपच येत नाही

आता तर स्वप्न हि पडत नाहीत पूर्वीसारखी

हल्ली रात्री पूर्वीसारख्या राहिलेल्या नाहीत

कारण, तू नसतेस न बरोबर.............



हो,पण असतात त्या आठवणी

हृदयाच्या कोपऱ्यात हळुवारपणे जपलेल्या,

करतात त्या सोबत अलीकडे

दिवसा, रात्री,कायमच

पण तुझी सर मात्र त्यांना येत nahi

कारण, तू नसतेस न बरोबर........



शेवटी आठवणीच त्या,

चांगल्या वाईट भूतकाळाच्या

हो,पण मला मात्र चांगल्याच आठवणी येतात तुझ्या

तुझे ते गोड हसणे,मला सतावताना खोडकर हसणे,

रात्री सारेच अस्ते डोळ्यांसमोर

पण, तू नसतेस न बरोबर........



हल्ली घेतो त्या आठवणींनाच कुशीत

बोलतो मग त्यांच्याशीच तू समजून

देतात परत ते सारे सुंदर क्षण

पण त्या वेळेची सर त्यांना येत नाही,

कारण, तू नसतेस न बरोबर....

        मंदार सावंत

केदार मेहेंदळे


Maddy_487


मिलिंद कुंभारे



Ankush S. Navghare, Palghar

Khup sundar kavita ahe...
Pahilya 4 oli apratim ahet...
... Regards.