अरे संसार संसार...

Started by मिलिंद कुंभारे, May 02, 2013, 03:14:25 PM

Previous topic - Next topic

मिलिंद कुंभारे

अरे संसार संसार...

अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर आधी हाताला चटके तव्हा मियते भाकर!
अरे संसार संसार खोटा कधी म्हनू नहीं राऊळच्या कळसाले लोटा कधी म्हनु नहीं
अरे संसार संसार नहीं रडन कुढ़न येड्या, गयातला हार म्हनू नको रे लोढ़न!
अरे संसार संसार खीरा येलावरचा तोड एक तोंडामधि कडू, बाकी अवघा लागे गोड..
अरे संसार संसार, म्हनू नको रे भिलावा त्याले गोड भिमफूल, मधि गोडम्ब्याचा ठेवा.
देखा संसार संसार, शेंग वरतून काटे अरे, वरतून काटे, मधी चिकने सागरगोटे
ऐका, संसार संसार दोन्ही जीवाचा ईचार, देतो दु:खाले होकार, अन सुखाले नकार..
देखा संसार संसार, दोन्ही जीवाचा सुधार कधी नगद उधार सुखा दु:खाचा बेपार..
अरे संसार संसार असा मोठा जादूगार माझ्या जीवाचा मंतर त्याच्यावरती मदार
असा संसार संसार आधी देवाचा ईसार माझ्या दैवाचा जोजार मंग जीवाचा आधार..!


-बहिणाबाई