आज तरी तू....

Started by rudra, May 03, 2013, 03:44:41 PM

Previous topic - Next topic

rudra

आज तरी तू मला साद देशील ना...?
कोंदटलेल्या श्वासांना स्पर्श तुझा करशील ना...?
वाट पाहून सखे मी झुरतो सदा मनी
आता तरी उदार होऊन,
अश्रू माझे पिशील ना... ?
हरलोय मी आता....
झालोय पोरका तुझावीना ,
एकदातरी हृदयाला तुझ्या 
मला बिलगवून घेशील ना ... ?
मृगजळाकडे आकर्षलो अन
घरचा चंद्र विसरलो गं  मी ... 
एखादी तरी रात्र मला तुझ्या
कुशीत घेशील ना... ?
अंतकळा दाराशी उभीय सखे 
कणाकणाने संपतोय मी ,
खरच नाही राहवत आता....
उघड्या डोळ्यांना मुक्ती तरी देशील ना...?
                                           
                                             - रुद्र   

मिलिंद कुंभारे