मदिरा

Started by मिलिंद कुंभारे, May 04, 2013, 12:30:30 PM

Previous topic - Next topic

मिलिंद कुंभारे

मदिरा

चांदराती त्या,
पडला होता सडा चांदण्यांचा,
अन मज सोबतीला,
निशा, शीतला, चंचला,
एवढ्यातच मज भेटली,
एक मदिरा,
बघितले तिज मी,
मला खुणावताना,
जवळ येउन
म्हणाली मजला,
चाखतोस का
एक थेंब मद्याचा,
बघ क्षणात अनुभवशील,
आनंद तू स्वर्गसुखाचा,
त्याच क्षणी,
नजरेआड झाल्या त्या,
निशा, शीतला, चंचला,
अन भाळलो मी
तिच्याच मादकतेला,
चाखला एक थेंब मदिरेचा,
दुजा, तिजा, चौथा अन,
प्यालो पूर्णच प्याला,
कळलेच नाही,
कशी, केव्हा,
चढली मज
धुंद नशा!

आठवेना मज आता,
प्यालो मी किती मदिरा,
एरव्ही मी मिठीत प्रेमसिंधुच्या,
अन पहाटे असे नयनी माझ्या,
सदैव पारिजात फुललेला,
आज पहिले मी,
स्वतःच स्वतःला,
गटारात लोळलेला,
आठवे मज आता,
ती चांदरात, अन त्या,
निशा, शीतला, चंचला!

त्याच क्षणी कोसू लागलो,
त्या भाळल्या क्षणाला,
त्या क्षणिक सुखाला,
त्या फसव्या मादकतेला!

पण अजूनही मज कळेना,
हुरहूर का सारखी मनाला,
पावले माझी का वळती,
पुन्हा पुन्हा, त्याच वाटेला!
अजूनही मज कळेना,
ओढ मज का असती,
वेड मज का लावती,
अन पुन्हा पुन्हा,
मज का भाळती,
अजूनही,
तीच मदिरा!
तीच मदिरा!


मिलिंद कुंभारे

नोंद:रसिक मित्रानो, हया किवितेतला मी, "तो मी नव्हेच".
मी अगदी साधा, सरळ एकाच रेषेत चालत राहणारा, मादिरेपासून चार हात लांबच!!!
कृपया गैरसमज नको!!!

Maddy_487


मिलिंद कुंभारे

Chaan aahe naaaa!!!!

pan naadi tichya lagu nakos!!!!!!!

Maddy_487

त्या क्षणीक सुखास मी भुलत नाही,
म्हणून गटारात पडलेला मी स्वतःला पाहत नाही

काळजी नसावी मित्रा
मदिरा मला आवडत नाही
म्हणून नादी  तिच्या मी लागत नाही  :D ;)

मिलिंद कुंभारे


मिलिंद कुंभारे

मीही कधीच पीत नाही रे मदिरा!!!!!
पण जे पितात त्यांच्यासाठीच आहे हि स्पेशल मदिरा!!!

केदार मेहेंदळे


SANJAY M NIKUMBH



मिलिंद कुंभारे

केदार दादा, मी हि मदिरा तुझ्यासाठी लिहिलीय,
पण सगळेच आता मलाच बेवडा समजायला लागलेत!!!!!!!!
  :( :( :(