संपवाव शेवटच...

Started by Ankush S. Navghare, Palghar, May 04, 2013, 10:29:43 PM

Previous topic - Next topic

Ankush S. Navghare, Palghar

आज मला अस वाटलं की
तुझ्याशी बोलाव शेवटच...

न जाणो उद्या मी असेन नसेन ह्या जगात
परत कधी मोकळेपणाने
हसायला मिळेल न मिळेल म्हणून
खुप खुप हसावं शेवटच...

अंतरातल्या दुखला वाट करून द्यावी
अश्रू न आणता केवळ सुक्या पापण्यांनी
खुप खुप रडावं शेवटच...

कधीच कुणासमोर मांडले नाही
आतल्या आत कुढत राहिलो पण
चेहऱ्यावर दाखवले नाही
त्या दुखात स्वतःला दुखवाव शेवटच...

हृदयाला कित्येक भाग आहेत
कितीतरी जणांचे तिथे निवास आहेत
नेहमीच धडकले सर्वांसाठी
पण आज त्याला पूर्णपणे
थांबवावं शेवटच...

नेहमी पापण्यांच्या कडा पाणावल्या
पण गुपचूप ओंजळीत भरून घेतले
कुणालाच न दाखविता लपविले
त्या अश्रूंना
जोरात वाहू द्याव शेवटच...

मनाला खुप वाटते बोलावे गावे
बडबडावे
कधीच नाही सांगितले
मन मोकळे नाही केले
पण आज वाटते ह्या सर्वांतूनच
मोकळ व्हाव शेवटच...

नाती खुप जपली
नात्यांसाठी खुप जगलो
क्षणभंगुर नात्यांसाठी रड रड रडलो
त्या नात्यांना आज संपवावं शेवटच...

जीवनात येऊन दुःखच वाट्याला आली
दुःखाच भोगली आणि दु:खातच जगलो
ह्या जीवनालाच आज
संपवावं शेवटच...
संपवावं शेवटच...

...प्राजुन्कुश
...Prajunkush.


www.facebook.com/ankush.navghare.353


Preetiii

नाती खुप जपली
नात्यांसाठी खुप जगलो
क्षणभंगुर नात्यांसाठी रड रड रडलो
त्या नात्यांना आज संपवावं शेवटच...

sahi ahe...


Ankush S. Navghare, Palghar

Preetii ji, Maduraji...
... Dhanyavad.

mohan3968


मिलिंद कुंभारे

मस्त!

अप्रतिम ........... :)

Ankush S. Navghare, Palghar

Mohan ji, Milind ji...
... Khup abhar manapasun.

Maddy_487

कधीच कुणासमोर मांडले नाही
आतल्या आत कुढत राहिलो पण
चेहऱ्यावर दाखवले नाही
त्या दुखात स्वतःला दुखवाव शेवटच...

khupch mast

Ankush S. Navghare, Palghar


Pranali Valunjikar