मदिरा

Started by केदार मेहेंदळे, May 07, 2013, 10:04:24 AM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

मिलिंद तुझ्या "मदिरा" ह्या कवितेला आणि तुझ्या अभिप्रायाला उत्तर 


संत पणाचे लक्षण ऐसे
करिती जनांस आपणा सारखे
संतच आम्ही कलीयुगातले
मित्रांना बनवितो तत्काळ बेवडे

सोड ह्ट्ट चल चाख जराशी
कर सार्थकता नरजन्माची
देवांनाही अप्राप्य अशी ही 
अमृत कुपी हि धरणी वरची

जे प्यायले ते जगले इकडे
न प्यायले ते मेले इकडे
जन्मा येउन पृथ्वीवर ते
मरत मरत ते जगले इकडे

नकोच रंभा, नको उर्वशी
नकोच तारे नको चंद्र ही
मनास एकट्या रिझवणारी
चाख एकदा मदिरा प्यारी


केदार...

rudra

kya baat hai bosss.....aj tar pyaylach havi.....huq se....

मिलिंद कुंभारे

#2
हे माणसा माणसा,
नकोच तुलना तुझी देवाशी,
देव, देवांस नसती व्याप कुठले,
आयुष्य त्यांचे भकास असती,
सुख, दुख:चा लवलेशही नसती,
मदिरा, रम्भा अन उर्वशी,
हेच त्यांची दैनंदिनी!

पण माणसा तुझे ऐसे नाही,
तू नाही रे कलियुगातला योगी,
स्वत:स नको समझू संत मुनी,
नकोस जाऊ मदिरेच्या आहारी,
बायको, मुले तुझीच रे आस धरती,
मदिरा पिउन मेंदू तुझा सुन्न होती,
तेव्हा तू फुलावशील कसा बाग ती,
नाही फुलवली बाग तू,
बरसेल का रे पाणी?
शमेल का रे कधी  तृषा तुझी?
खंत मनी राहील सदा,
कसाच निरर्थक जन्म जाहला!
म्हणून रे माणसा, विसर मदिरा,
अन धर कास तू माणसाची,
अन कर सार्थकता मानव जन्माची!

मिलिंद कुंभारे

sweetsunita66


नको इन्द्र पुरीची  उर्वशी ,रंभा नको सोमरसाचा प्याला
करण्या कर्तृत्व या जगतामध्ये धन्य नरजन्म झाला
                       मस्त कविता ...  :) :) :) :) :) :) :)

मिलिंद कुंभारे



नको इन्द्र पुरीची  उर्वशी ,रंभा नको सोमरसाचा प्याला
करण्या कर्तृत्व या जगतामध्ये धन्य नरजन्म झाला
                       मस्त कविता ...  :) :) :) :) :) :) :)