हे माणसा माणसा

Started by मिलिंद कुंभारे, May 07, 2013, 11:16:51 AM

Previous topic - Next topic

मिलिंद कुंभारे

हे माणसा माणसा!

हे माणसा माणसा,
नकोच तुलना तुझी देवाशी,
देव, देवांस नसती व्याप कुठले,
आयुष्य त्यांचे भकास असती,
सुख, दुख:चा लवलेशही नसती,
मदिरा, रम्भा अन उर्वशी,
हेच त्यांची दैनंदिनी!

पण माणसा तुझे ऐसे नाही,
तू नाही रे कलियुगातला योगी,
स्वत:स नको समझू संत मुनी,
नकोस जाऊ मदिरेच्या आहारी,
बायको, मुले तुझीच रे आस धरती,
मदिरा पिउन मेंदू तुझा सुन्न होती,
तेव्हा तू फुलावशील कसा बाग ती,
नाही फुलवली बाग तू,
बरसेल का रे पाणी?
शमेल का रे कधी  तृषा तुझी?
खंत मनी राहील सदा,
कसाच निरर्थक जन्म जाहला!
म्हणून रे माणसा, विसर मदिरा,
अन धर कास तू माणसाची,
अन कर सार्थकता मानव जन्माची!

मिलिंद कुंभारे

sweetsunita66

तू नाही रे कलियुगातला योगी,
स्वत:स नको समझू संत मुनी,
नकोस जाऊ मदिरेच्या आहारी,
बायको, मुले तुझीच रे आस धरती,
मदिरा पिउन मेंदू तुझा सुन्न होती,
तेव्हा तू फुलावशील कसा बाग ती,
नाही फुलवली बाग तू,
बरसेल का रे पाणी? ,,,,,,,,,,,,,,,छान !प्रामाणिक पणाने विचार मांडले ,पण कोणी गंभीरपणे घेतले ?

मिलिंद कुंभारे