नृत्य समाधी .

Started by विक्रांत, May 07, 2013, 02:38:44 PM

Previous topic - Next topic

विक्रांत


नृत्याची झिंग कर्पुरी देहावर
नाचते वीज अंगागावर
कमनीय बांधा लचकेत थरार
उसळत्या लाटा किनाऱ्यावर
आवेग आवर्तन अणूरेणूवर
पावलो पावली नुपूर झंकार
यौवन देही साक्षात मंदार
स्वैर होवून बटा चुकार
चुंबती उन्नत कपोल हळुवार
काळवेळ विसरून सार
अनामाशी जुळले सूर
बेहोष समाधी लौकिका शरीर
थकला श्वास स्वेद चेहऱ्यावर
तृप्तीचे हासू रेखीव ओठावर
मृगनयनात अनोखी भिरभिर

विक्रांत प्रभाकर

मिलिंद कुंभारे

भारी कविता आहे!!
माझ्यासारख्याला समजायला खूपच कठीण!!

उसळत्या लाटा किनाऱ्यावर
आवेग आवर्तन अणूरेणूवर :) :) :)

केदार मेहेंदळे


विक्रांत

धन्यवाद केदार,मिलिंद

Ankush S. Navghare, Palghar

Vikrant ji... Kavita vachun kharach samadhi lagali..

विक्रांत