एक दुपार

Started by विक्रांत, May 07, 2013, 03:50:15 PM

Previous topic - Next topic

विक्रांत


सूर्य होता आग ओकत
जणू सुडाने विश्व जाळत
एकच ढग निळ्या नभात
उभा होता अंग चोरत
उष्ण वारा उगा वळवळत
होता वाळली पाने हलवत
दारात अंगणात माजघरात
सुन्न शांतता होती नांदत
झाडाखाली थोड्या सावलीत
कुत्रे होते पडले निपचित
भर पेठेत मोकळ्या रस्त्यात
उन रणरणत सुन्न निवांत

विक्रांत प्रभाकर


केदार मेहेंदळे


मिलिंद कुंभारे

एकच ढग निळ्या नभात
उभा होता अंग चोरत...........

एकच?????.......का?????????

कित्येक ढग निळ्या नभात
उभे होते अंग चोरत...........


sorry!!!
छान कविता आहे!