आई

Started by rahulap, May 09, 2013, 01:20:48 PM

Previous topic - Next topic

rahulap

प्रणव तो ओंकार असत नाही
बालपणी मी प्रथम बोललो आई
जल हे जीवन असत नाही
जीवनाहून अधिक असते आई
आग ही जाळत काही नाही
सुर्याहून दाहक असते आई
झंझावातात वारा असत नाही
मायेची फुंकर असते आई
आकाश अनंत असत नाही
निस्सीम प्रेम असते आई
पंचमहाभूतांचे जग असत नाही
सर्वांचे जग असते आई

मिलिंद कुंभारे



पंचमहाभूतांचे जग असत नाही
सर्वांचे जग असते आई.........


छान!