आठवण

Started by Hareshwar, May 09, 2013, 10:04:24 PM

Previous topic - Next topic

Hareshwar

आठवण
आता ती मला नाही आठवत ,
मी नाही जगात रात्र रात्र आता तिच्या आठवणीत ...
जरी स्वप्नात ' ती ' आली तरी स्वप्नात येणारी ' ती '
हि तीच आहे हेच आता नाही पटत ...
आता ती मला नाही आठवत !!
पूर्वी तिची पत्रे यायची ,
माझ्याच पत्यावर , माझ्याच नावाची ,
माझ्याच प्रेमाची , माझ्याच आठवणीची ...
तसली पत्रे आता कुणीच नाही पाठवत ...
आता ती मला नाही आठवत !!
मी तिच्या प्रेमात पडलो 'तो क्षण '
आम्ही दोघेही सोबत होतो 'तो क्षण '
आणि ती मला सोडून गेली 'तो क्षण '
या क्षन्नांच गणित मला नाही सुटत ...
आता ती मला नाही आठवत !!
देवळातल्या देवाशी मी अजूनही भांडतो ,
फक्त तुझ्याच सुख साठी ,
येउन बघ एकदा त्याच नि माझ भांडण
अजूनही नाही मिटत ...
आता ती मला नाही आठवत !!

Hareshwar...

मिलिंद कुंभारे


Ankush S. Navghare, Palghar